अपघात रोखण्यासाठी बंद दरवाजांच्या लोकलचा प्रस्ताव

December 2, 2015 1:50 PM2 commentsViews:

local door02 डिसेंबर : मुंबईतल्या वाढते रेल्वे अपघात रोखण्यासाठी बंद दरवाजांच्या लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव समोर आलाय. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर मुंबई-ठाण्यातल्या शिवसेना-भाजपच्या खासदारांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली. आणि त्यांच्यापुढे मुंबईकरांना भेडसावणार्‍या समस्यांचं गार्‍हाणं मांडलं.

लोकलचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी मेट्रोसारखे स्वयंचलित बंद दरवाजे बसवण्याचा प्रस्ताव खासदारांनी ठेवला. त्यावर याबाबत एका महिन्याच्या आत अहवाल देण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहे. याचबरोबर लोकलशी संबधित इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा झाली. पण बंद दरवाजाच्या लोकल सुरू करायला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मात्र विरोध केलाय. एसी लोकल नसल्यानं प्रवासी गुदमरण्याची भीती त्यांनी व्यक्त केलीय. मुंबईत तब्बल 75 लाख प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात. रेल्वेचे दरवाजे बंद केले तर ते गुदमरतील, याची रेल्वेमंत्र्यांना जाण असावी असं अरविंद सावंत यांनी म्हटलंय. तसंच, दरवाजे बंद करून प्रवास करण्यासाठी आपल्या लोकल वातानुकुलीत नाही, असंही अरविंद सावंत सांगितलं.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Atul More

  रेल्वे अपघात बाबत
  काल तुमचा रोखठोक मधील सवांद पहिला त्यामध्ये रेल्वे मध्ये काही नवीन बदल करण्यात येतील
  असे सगण्यात आले परंतु कितीही बदल केले तरी जी गर्दी आहे ती काही कमी होणार नाही आणि
  जे बदल करण्यात येणार आहे त्यासाठी किती कालावधी लागेल हेही सांगता येणार नाही. खरतर
  सकाळी मुंबईकडे जाताना आणि सायंकाळी मुंबई वरून जाताना गर्दी असते कारण सर्वाना वेळेत
  कामात जायचे आहे आणि लवकर घरी जायचे आहे शक्यतो मुंबई मधील बहुतेक ओफिसिस चे वेळ जी
  आहे ती सकाळी ९ ते १० आणि सायंकाळी सुटायची वेळ ६ ते ७ यावेळेत आहे साधारणता पाहता
  working hours ९ ते १० तास आहे government ऑफिसस ची वेळ लिमिटेड आहे परंतु private कंपनी मध्ये ९ ते १० काम असते किंवा त्यापेक्षा
  जास्तही. जर ऑफिसस ची वेळ ही सकाळी ७ ते रात्री
  १० असे करून या वेळेत तुम्ही तुमचे जे काही working hours आहे ते पूर्ण करून घरी जाऊ
  शकता किंवा वेळ आग्जेस करून शिफ्ट करण्यात यावे असे नियम जर ऑफिसस मध्ये केले तरी जी लोकल ट्रेन मध्ये
  गर्दी होत आहे त्यावर नियंत्रण येऊ शकते. private कंपनी मध्ये असे नियम जर लागू करायचे
  असतील तर शासनाने निर्णय घ्याला हवेत. यामध्ये शाळा कॉलेज यांचाही वेळेचाही विचार केला
  गेला पाहिजे.

 • Atul More

  रेल्वे मध्ये काही नवीन बदल करण्यात येतील असे सगण्यात आले परंतु कितीही बदल केले तरी जी गर्दी आहे ती काही कमी होणार नाही आणि जे बदल करण्यात येणार आहे त्यासाठी किती कालावधी लागेल हेही सांगता येणार नाही. खरतर सकाळी मुंबईकडे जाताना आणि सायंकाळी मुंबई वरून जाताना गर्दी असते कारण सर्वाना वेळेत कामात जायचे आहे आणि लवकर घरी जायचे आहे शक्यतो मुंबई मधील बहुतेक ओफिसिस चे वेळ जी आहे ती सकाळी ९ ते १० आणि सायंकाळी सुटायची वेळ ६ ते ७ यावेळेत आहे साधारणता पाहता working hours ९ ते १० तास आहे government ऑफिसस ची वेळ लिमिटेड आहे परंतु private कंपनी मध्ये ९ ते १० काम असते किंवा त्यापेक्षा जास्तही. जर ऑफिसस ची वेळ ही सकाळी ७ ते रात्री १० असे करून या वेळेत तुम्ही तुमचे जे काही working hours आहे ते पूर्ण करून घरी जाऊ शकता किंवा वेळ आग्जेस करून शिफ्ट करण्यात यावे असे नियम जर ऑफिसस मध्ये केले तरी जी लोकल ट्रेन मध्ये गर्दी होत आहे त्यावर नियंत्रण येऊ शकते. private कंपनी मध्ये असे नियम जर लागू करायचे असतील तर शासनाने निर्णय घ्याला हवेत. यामध्ये शाळा कॉलेज यांचाही वेळेचाही विचार केला गेला पाहिजे.

close