कुंभमेळ्यात पहिले शाही स्नान

February 12, 2010 3:50 PM0 commentsViews: 7

12 फेब्रुवारीहरिद्वारमधे सुरु असलेल्या पवित्र 3 शाही स्नानांपैकी पहिले शाही स्नान आज उत्साहात पार पडले. लाखो भाविकांनी आज गंगेत स्नान केले. यानंतरचं शाही स्नान 15 मार्चला सोमवती अमावस्येच्या दिवशी आहे. तर तिसरे शाही स्नान 14 एप्रिलला होणार आहे. या स्नानाला मुख्य शाही स्नान पर्व म्हटले जाते.महाशिवरात्रीच्या दिवशीच शंकर आणि पार्वतीचे लग्न झाले होते, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे कुंभमेळ्यात या दिवसाला महत्त्व आहे. आजच्या शाही स्नानात मान असलेले भस्मधारी साधू, नागा साधूंनी शाही स्नान केले. त्यानंतर भाविकांनी स्नान केले. सुरक्षेसाठी या ठिकाणी 9 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. हा कुंभमेळा 28 एप्रिलच्या वैशाख पौर्णिमेपर्यंत होणार आहे.

close