गुजरातमध्ये महापालिका निवडणुकीत भाजपची आघाडी

December 2, 2015 2:38 PM0 commentsViews:

BJP_PTI02 डिसेंबर : गुजरातमधल्या निवडणूक झालेल्या सर्वच्या सर्व सहा महापालिकांमध्ये भाजपनं आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे पटेलांचा नेता हार्दिक पटेलच्या प्रभागातच भाजपचा उमेदवार निवडून आलाय.

गुजरातमध्ये सहा महापालिका, 56 नगरपरिषद आणि 36 जिल्हा परिषदांसाठी आत मतमोजणी होतेय. अहमदाबाद, सुरत, बडोदा, राजकोट, जामनगर आणि भावनगर या सहा महापालिकांमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. स्थानिक स्वराज संस्थातल्या निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्येच चुरस आहे. बिहारमधल्या विधानसभेच्या निकालानंतर गुजरातमध्ये भाजपची परीक्षा आहे.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close