फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग झाला बाबा, 99 टक्के शेअर्स करणार दान

December 2, 2015 5:08 PM0 commentsViews:

Max Chan Zuckerberg, Mark Zuckerberg, Priscilla Chan Zuckerberg02 डिसेंबर : फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गच्या घरी नन्ही परी आली असून फेसबुकचा संस्थापक म्हणून ओळखला जाणारा झुकरबर्ग आता बाबा झालाय. झुकरबर्ग दाम्पत्याला मागील आठवड्यात मुलगी झाली. झुकरबर्ग दाम्पत्यानं तिचं नाव मॅक्स असं ठेवलंय.

मार्कनं मुलीला उद्देशून एक पत्र लिहिलंय, आणि ते त्यानं फेसबुकवर पोस्ट केलंय. मार्क एक नवीन ट्रस्ट स्थापन करणार आहे, आणि मार्ककडे असलेले फेसबुकचे 99 टक्के शेअर्स या ट्रस्टच्या नावानं देण्याचं मार्कनं जाहीर केलंय. गरिबांचे उपचार, शिक्षण, गरिबी निवारण आणि स्वच्छ उर्जेवर हे ट्रस्ट काम करणार आहे. चॅन झकरबर्ग इन्टीटीव्ह असं या संस्थेचं नाव आहे.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close