डोंबिवलीत चड्डी बनियान गँग सीसीटीव्हीत कैद, चक्क चपला,बुटं केली लंपास

December 2, 2015 5:37 PM0 commentsViews:

02 डिसेंबर : मुंबईतील डोंबिवलीमध्ये घरफोड्या करणारी चड्डी बनियान गँगने पुन्हा एकदा डोकंवर काढलंय. ही गँग आता सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पण दरोड्यात हाती काही लागल्यामुळे चक्क चपला,बुटं लंपास केली.chaddi gang

डोंबिवलीच्या राजुनगर येथील सुदामा कॉम्प्लेक्समध्ये या गँगने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला. या दरोडेखोरांनी घरफोडी केलेल्या रिकाम्या फ्लॅटमध्ये काहीच सापडले नाही म्हणून त्यांनी बिल्डिंगच्या पॅजेसमधल्या चक्क चपला चोरल्याचं लंपास केल्याचं आढळून आलंय. या चोरांच्या हातात धारदार शस्त्रे दिसून आल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशतीचं वातावरण आहे. पोलिसांनी मात्र, या चड्डी गँगला जेरबंद करण्यासाठी अजून काहीच हालचाल केलेली नाही.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close