बाप रे, तब्बल1 किलोमिटर उंचीची इमारत !

December 2, 2015 5:46 PM0 commentsViews:

जगातील सर्वात उंच असणारी साउदी अरबमधील बुर्ज खलिफा ही इमारत सर्वत्र प्रसिद्ध आहे. ही इमारत सध्या जगातील प्रमुख व्यावसायिक केंद्र म्हणून ओळखली जाते. पण लवकरच बुर्ज खलिफाचाही विक्रम मोडणारी नवी इमारत साउदीने बनवायचं ठरवलं आहे.

या नव्या इमारतीचं नाव ‘किंगडम टॉवर’ ठेवण्यात येणार असून ती तब्बल 170 मजल्यांची असेल. संपुर्ण इमारतीला बनवायला जवळपास 2 अब्ज डॉलर इतका खर्च येणार आहे.

किंगडम टॉवर ही इमारत साउदीच्या राजधानीत अर्थात जेद्दाह येथे बांधण्यात येणार असून त्यासाठी अनेक बांधकाम व्यावसायिक एकत्र आले आहेत. या इमारतीची उंची ही थोडी थोडकी नाहीतर तब्बल 1 किलोमिटर म्हणजेच 3300 फूट उंच असणार आहे. त्यामुळेच ही जगातील सर्वात उंच इमारत ठरणार आहे. 2018 च्या सुमारास ही इमारत तयार होणार असून त्यात बरेच हॉटेल्स, अपार्टमेंट आणि ऑफिसेस असतील.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close