ठाणे, पुणे, नाशकात हाऊसफुल्ल

February 13, 2010 8:53 AM0 commentsViews: 4

13 फेब्रुवारीशिवसेनेची दादागिरी धुडकावून मुंबईपाठोपाठ आज शाहरुखचा माय नेम इज खान हा सिनेमा ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूरमध्येही रिलीज झाला. पुण्यात ई स्वेअर, सिटी प्राईड, मंगला या सर्व थिएटरर्ससह 23 ठिकाणी माय नेम इज खान 12 वाजता रिलीज झाला. नाशिकमध्ये तीन थिएटर्समध्ये सिनेमा रिलीज झाला. ठाण्यातील इटर्निटी मॉलमधून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माय नेम इज खानची 100 तिकिटे खरेदी केली आहेत. नागपूरमधील पाच थिएटर्समध्ये सिनेमा रिलीज झाला. जळगावातही शिवसैनिकांच्या विरोधाला न जुमानता प्रेक्षकांनी माय नेम खान सिनेमा पाहिला. नटराज थिएटरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या 28 शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबईत प्रेक्षकांनी सिनेमाला चांगला प्रतिसाद देत शिवनेच्या गुंडगिरीला चपराक दिली. त्यामुळे थिएटर मालकांचा आत्मविश्‍वास वाढला आहे.

close