औरंगाबादेत भरदिवसा दरोडा, महिलेची गळा चिरुन हत्या

December 2, 2015 6:23 PM0 commentsViews:

crime scene02 डिसेंबर : औरंगाबादमध्ये भरदिवसा दरोडा पडण्याच्या घटनांना आळा घालण्यात पोलिसांना अपयश आलंय. आज सिडको भागात सकाळी 10 च्या सुमारास दरोडेखोरांनी एका घरात दरोडा टाकून महिलेची गळा चिरुन हत्या केलीये. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये.

सिडको एम 2 भागातील विमलज्योती सहकारी गृहनिर्माण सोसयाटीच्या दुसर्‍या मजल्यावर राहणार्‍या चित्रा डकरे यांची हत्या झालीये. हत्या झाली त्यावेळेस चित्रा डकरे या एकट्या घरामध्ये होत्या. याचा फायदा घेत चोरट्यांनी दरोडा टाकला. चोरट्यांनी आजूबाजूच्या घरांना बाहेरून कडी लावून ही हत्या केलीये. चोरट्यांनी घरातून एकही वस्तू चोरून नेली नसल्याचं मयत चित्रा यांच्या पतीनं सांगितलं. एवढंच नाहीतर मयत चित्रा यांच्या अंगावरील दागिन्यांना सुद्धा चोरट्यांनी हात लावलेला नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलीस अधिक तपास करत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close