आता तरी बोध घ्या…

February 13, 2010 9:04 AM0 commentsViews: 4

13 फेब्रुवारीलोकांच्या पाठिंब्याशिवाय कोणतेही आंदोलन करणे निरर्थक आहे. माय नेम इज खान हा सिनेमा तसेच राहुल गांधींविरोधातील फसलेल्या आंदोलनापासून शिवसेनेने आता तरी बोध घ्यावा, असा सल्ला मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे.सेनेच्या विरोधानंतरही काल मुंबईत 'माय नेम इज' रिलीज झाला आणि त्याला प्रेक्षकांचा प्रतिसादही चांगला मिळाला. पोलिसांनी हुल्लडबाजी करणार्‍या शिवसैनिकांचा ताबोडतोब बंदोबस्त केला. विशेषत: मुख्यमंत्र्यांनी हा सिनेमा रिलीज व्हावा म्हणून विशेष काळजी घेतली होती. त्यामुळे हे मुख्यमंत्र्यांचे राजकीय यश मानले जात आहे. मुंबईत सिनेमा यशस्वी रिलीज झाल्याने उर्वरित महाराष्ट्रातही आज हा सिनेमा रिलीज झाला.

close