आणखी सासरुवाशीनीची छळ, मंदिराच्या परिसरात दिला बाळाला जन्म !

December 2, 2015 9:19 PM0 commentsViews:

kolhapur news302 डिसेंबर : औरंगाबादमध्ये सारिका अग्रवाल या तरुणीची सासरकडून होणार्‍या छळाची घटना ताजी असताना आणखी एक घटना
कोल्हापुरात घडलीये. एका गरोदर महिलेला तिच्या सासरच्यांनी घराबाहेर काढलं. या महिलेची प्रसुती अंबाबाई मंदिर परिसरातच मध्यरात्री झाली.

ही नवजात माता कर्नाटकातल्या संकेश्वरमधली आहे. या महिलेला काही दिवसांपूर्वी तिच्या सासरच्या मंडळींनी घराबाहेर काढलं. त्यानंतर ही महिला भटकंती करत शहरातल्या भवानी मंडपात पोहोचली. पण मध्यरात्री या महिलेला प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्या. त्यावेळी तिथं असलेल्या भिकारी महिलांनी या महिलेचा आवाज ऐकून तिला मदत केली आणि तिची प्रसुती सुखरुपपणे पार पाडली. त्यानंतर आज दुपारपर्यंत ही महिला त्याच ठिकाणी आपल्या बाळासह होती.

त्यावेळी काही नागरिकांना ही गोष्ट समजल्यावर मनपाच्या आरोग्य अधिकार्‍यांना ही माहिती देण्यात आली पण त्यांनी आपले हात झटकले. त्यामुळे थेट सीपीआर रुग्णालयाशी संपर्क साधल्यावर तिथं ऍम्ब्युलन्स दाखल झाली आणि या महिलेला तिच्या बाळासह रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या या दोघांचीही प्रकृती स्थिर असून दोघांवरही उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिलीय.

देशाच्या सर्वोच्च सभागृहात म्हणजे सहिष्णुता-असहिष्णुता यावर जोरदार चर्चा घडताहेत. त्याचवेळेला आपल्या अवतीभवती किती मोठ्या प्रमाणात असंवेदनशीलता रुजलेली आहे ते दिसतं आणि त्याचवेळेला मदतीचे हातही कसे पुढे येतात ते दिसतंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close