गौरी खान आघाडीवर

February 13, 2010 9:21 AM0 commentsViews: 6

13 फेब्रुवारीमाय नेम इज खान सिनेमावरून मुंबई आणि महाराष्ट्रात सेनेचा राडा सुरू असताना शाहरुख खान मात्र परदेशात या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होता. पण शाहरुखची उणीव भरुन काढली त्यांची पत्नी गौरीने. कालच्या गडबड गोंधळातही ती सिनेमाच्या प्रमोशनसाठी थिएटर्सना भेटी देत होती. काल तिने 'फन रिपब्लिक'ला भेट दिली. तर आज नरीमन पॉईंटवरच्या आयनॉक्स आणि चर्चगेटमधल्या मेट्रो सिनेमाला ती भेट देणार आहे. गौरीने करण जोहरसोबत 'माय नेम इज'ची निर्मिती केलेली आहे. शाहरुख आज बर्लिनहून मुंबईत परतणार आहे.

close