अकोल्यात आंतरराष्ट्रीय किडनी विक्री रॅकेट, आणखी दोघांची किडनी विकली

December 3, 2015 2:23 PM0 commentsViews:

akola kidni03 डिसेंबर : अकोल्यात किडनी विक्रीचं आंतरराष्ट्रीय रॅकेट चालवलं जात असल्याचे आणखी पुरावे समोर आले आहे. आणखी दोन जणांनी किडनी विक्री केल्याचं मान्य केलंय. कर्जाची परतफेड शक्य नाही म्हणून त्याबदल्यात त्यांच्या किडनी विकल्याचं स्पष्ट झालंय.

त्याबदल्यात त्यांना जास्त पैशांचं आमिष दाखवण्यात आलं. यामध्ये शांताबाई रामदास खरात यांच्यावर 30 हजारांचं कर्ज होतं. त्यांच्या किडनीची किंमत ठरली होती. 4 लाख रुपये, पण त्यांना फक्त दोनच लाख मिळाले. तर देवानंद कोमलकर या यांच्यावर 1 लाखांचं कर्ज होतं. त्यांना किडनीच्या बदल्यात 8 लाख रुपये मिळतील असं सांगण्यात आलं होतं. पण प्रत्याक्षात मिळाले 4 लाख रुपये. या दोघांचीही ऑपरेशन्स औरंगाबादमध्ये झाली. यामध्येही आरोपी आनंद जाधव आणि विनोद शिरसाठ यांचाच हात आहे. संतोष गवळी याचीही किडनी 20 हजार रुपयांसाठी अशीच विकण्यात आली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close