‘मंदिर वही बनाएंगे’, भागवतांनी दिला पुन्हा नारा

December 3, 2015 3:07 PM0 commentsViews:

M_Id_405192_Mohan_Bhagwat03 डिसेंबर : संघानं पुन्हा एकदा ‘मंदिर वही बनाएंगे’चा नारा दिलाय. अयोध्येत राममंदिर बांधणं हेच आपल्या जीवनाचं लक्ष्य आहे, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय. ते कोलकातामध्ये बोलत होते.

भगवान राम भारताच्या कणाकणामध्ये सामवलेले आहे. राम मंदिर उभारण्याचा संकल्प पूर्ण होऊनच राहील. हेच माझ्यासमोर मोठ लक्ष्य आहे. आम्हाला एक भव्य असं मंदिर उभारायचंय असंही भागवत म्हणाले. भागवत हे पहिल्यांदाच असं बोलले नाही. या आधीही विश्व हिंदू
परिषदचे ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांच्या शोकसभेत राम मंदिराचा मुद्दा उपस्थितीत केला होता. राम मंदिर व्हावंही सिंघल यांची इच्छा आपण पूर्ण केली पाहिजे असं भागवत म्हणाले होते.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close