मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत संभ्रम कायम, 5 डिसेंबरबद्दल भाजप नेत्यांनाच माहित नाही !

December 3, 2015 7:40 PM0 commentsViews:

cm meet v rao03 डिसेंबर : बर्‍याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराचा घोळ अजूनही कायमचं आहे. विस्तार होणार असल्याची माहिती भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी दिली होती. मात्र या घोषणेनंतर संभ्रम कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्यपालांची भेट घेतलीये, मात्र ही भेट नक्की कशासाठी होती याच गूढ कायम आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आज (गुरुवारी) राज्यपालांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधान आलंय. पण मुख्यमंत्री आणि राज्यापालांकडे मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा झाली की हिवाळी अधिवेशनाबाबत हे अजून अधिकृतपणे समजू शकलेलं नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार आगामी अधिवेशनातील प्रस्तावित विधेयकावरच चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय. पण, आजच मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा करणार आहेत.

विशेष म्हणजे मत्रिमंडळाच्या विस्तारावरुन सेना आणि भाजपमध्ये धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली होती. सेनेचे मंत्री सुभाष देसाई यांनी भाजप मुद्दामहुन विस्ताराला उशिर करत आहे अशी टीका केली होती. तर दुसरीकडे विस्तारात मुख्यमंत्री आपल्याकडे असलेलं गृहमंत्रिपद सोडण्याची शक्यता आहे. तसंच पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त खात्यांचा भार कमी करण्याची शक्यता आहे. या विस्तारात भाजपला पाच, मित्रपक्षांना तीन, शिवसेनेला दोन मंत्रिपद देण्याच ठरलंय. भाजपकडून अनेक जेष्ठ नेते मंत्रिमंडळात येण्यासाठी इच्छूक असल्यामुळे मुख्यमंत्र्यापुढे मोठा पेच आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तारात काय काय होतं हे पाहण्याचं ठरणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close