‘ती’ लोकं जखमेनं विव्हळत होती, लोकं मोबाईलवर व्हिडिओ रेकाॅर्ड करत होती !

December 3, 2015 5:09 PM0 commentsViews:

03 डिसेंबर : माणुसकी किती संपलीये याचं ताज उदाहरण नागपुरात पाहण्यास मिळालं. अपघातग्रस्तांना मदत करण्याचं सोडून लोकं मोबाईलवर व्हिडिओ काढण्यात व्यस्त होते. लोकांच्या या निर्लज्जपणामुळे एकाला आपला जीव गमवावा लागला.nagpur accident

नागपूरच्या खरबी रोड परिसरात ट्रकने एका आॅटो रिक्षाला धडक दिली. या धडकेत जखमी झालेल्या लोकांना मदत देण्याएवजी लोक मोबाईलमध्ये व्हिडिअो रेकाॅर्ड करत होती आणि फोटो काढत असल्याची परिस्थती कॅमेरात कैद झाली आहे. दोन लोक रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत विव्हळत असतांना लोक मोबाईलने व्हिडिओ काढत होते. या अपघातात एका जखमीला हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यास उशीर झाल्यामुळे मृत्यू ओढावला. या घटनेमुळे माणुसकी संपली आहे का हा प्रश्न निर्माण झालाय.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close