मित्राचाही टोला

February 13, 2010 9:38 AM0 commentsViews: 1

13 फेब्रुवारीशिवसेनेच्या सध्या सुरू असलेल्या हिंसक आंदोलनावरून सेनेवर जोरदार टीका होतेय. अशा वेळी मदतीचा हात देण्याऐवजी सेनेचा मित्रपक्ष भाजप सेनेला आणखीच अडचणीत आणत आहे. मुंबई सर्वांचीच आहे, असा पुनरुच्चार भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला आहे. मुंबई ही सर्वांची असून देशाचा मुंबईवर अधिकार असल्याचे गडकरी म्हणाले आहेत. या प्रश्नावर शिवसेनेशी मतभेद असल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. मात्र यावरून सेनेशी असलेली युती तुटणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तिरूअनंतरपुरम इथे झालेल्या मीट द प्रेस कार्यक्रमात ते बोलत होते.

close