आयपीएलला तेलंगणा वादाचा फटका

February 13, 2010 9:48 AM0 commentsViews: 3

13 फेब्रुवारीआयपीएलचे उद् घाटन आणि उद्घाटनाची मॅच हैद्राबादमध्ये न घेण्याचा निर्णय अखेर आयपीएल प्रशासनाने घेतला आहे. स्वतंत्र तेलंगणा वादामुळे यापूर्वीच हैद्राबादमध्ये मॅच घेण्यावरुन वाद सुरु होता. आंध्रप्रदेश सरकारने मॅच हैद्राबाद बाहेर हलवण्यात येऊ नयेत यासाठी आयपीएलवर दबाव आणला होता. डेक्कन चार्जर्स टीमलाही त्यांनी आयपीएलवर बहिष्कार घालण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर ललित मोदींनी मग बचावात्मक पवित्रा घेत मॅचविषयी काही दिवसात निर्णय घेऊ असं म्हटलं होतं. पण आताआयपीएलच्या मॅच हैद्राबादमध्ये न घेण्याचा पवित्रा आयपीएलने घेतला आहे.

close