धावती लोकल पकडू नका !, एकदा हा व्हिडिओ पाहा

December 3, 2015 8:43 PM0 commentsViews:

03 डिसेंबर : मुंबईत एका बाजूला गर्दीमुळे धावत्या लोकमधून पडून प्रवाशी मृत्युमुखी पडत आहेत. तर दुसर्‍या बाजूला घाईगडबडीत लोकल पकडतांना अनेक जणांना आपला प्राण गमावावा लागतोय. असाच एक प्रकार बदलापूर स्टेशनवर समोर आलाय.local train accident

धावती लोकल ट्रेन पकडण्याचा प्रयत्नात इमरान शेख हा युवक जखमी झालाय. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात रेकॉर्ड झालाय.डी सुरू होण्याची वाट पाहत असलेला इमरान शेवटच्या टप्यात लोकल पकडायला गेला आणि दरवाजाच्या हँडलवरुन त्याचा हात सटकला.
प्लॅटफॉर्म संपतो त्या ठिकाणी इमरान खाली पडला. सध्या इमरानवर कल्याण इथल्या मीरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close