शिक्षा संपण्याचा 6 महिन्याआधीच संजय दत्त जेलबाहेर ?

December 3, 2015 8:56 PM0 commentsViews:

sanjay-dutt-6103 डिसेंबर : 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त शिक्षा संपण्याच्याआधीच जेलबाहेर येण्याची शक्यता आहे. संजय दत्त शिक्षा संपण्याच्या 6 महिने आधीच जेल बाहेर येऊ शकतो. कारागृहात असताना चांगल्या वर्तवणुकीमुळे संजयला जेल बाहेर सोडण्यात येऊ शकतं अशी माहिती जेल प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकार्‍यांनी दिलीये.

पुण्यातील येरवडा तुरुंगात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्त पाच वर्षांची शिक्षा भोगत आहे. याआधी त्याने 18 महिने शिक्षा भोगलीये. उर्वरीत शिक्षा संजय सध्या तुरुंगात भोगत आहे. संजयचं वर्तवणूक हे चांगलं असून त्यामुळे याचा परिणाम त्याच्या शिक्षेवर होऊ शकतो. तुरुंगात एखाद्या कैद्याची वागणूक चांगली असली तर वर्षभर चांगलं काम केल्यास 30 दिवस सुट्टी मिळते. याचा फायदा संजय दत्तला होण्याची शक्यता आहे. पण ही सूट देण्याचे अधिकार उपमहानिरिक्षक,महानिरिक्षक आणि अप्पर पोलीस महासंचालकांना आहे.
विशेष म्हणजे, संजय दत्तला स्पेशल ट्रिटमेंट मिळवण्यासाठी अनेक बड्या व्यक्तींनी नियमांची पडताळणी केलीये. विशेष म्हणजे, संजयने वारंवार पॅरोल असो अथवा फर्लोवर तो जेलबाहेर आला आहे. त्यामुळे आता संजूबाबा पुन्हा एकदा जेलबाहेर कायमचा येण्यासाठी धडपड करतोय.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close