चेन्नईत पुन्हा पावसाला सुरुवात, मदतकार्यात अडथळे

December 5, 2015 2:36 PM0 commentsViews:

Chennai05 डिसेंबर : दक्षिण भारतातलं अवाढव्य महानगर चेन्नई मुसळधार पावसापुढे हतबल झालंय. चेन्नईमध्ये गेल्या तीन दिवसांपासून जो महापूर आलाय तो ओसरायचं नाव घेत नाहीये. चेन्नईमध्ये परत मुसळधार पावसाला सुरुवात झालीये. त्यामुळे मदतकार्यात अडथळे येते आहे. मात्र, चेन्नई आता हळूहळू पूर्वपदावर येतीये. आतापर्यंत 11 लाख लोकांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

दरम्यान, दिल्लीमध्ये उच्चपदस्थ अधिकार्‍यांची गृहमंत्रालयानं बैठक बोलावली होती. यामध्ये एनडीआरएफ, दूरसंचार आणि रेल्वे मंत्रालयाच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे. मदतकार्य सुरू आहे. पण अजूनही शहराच्या काही भागांमध्ये पाणी तुंबलेलं आहे. चेन्नई विमानतळाचा रनवे फक्त तांत्रिक विमान उड्डाणांसाठीच खुलं करण्यातच आलं आहे. पण अजूनही प्रवासी वाहतूक सुरू झालेली नाही. व्यावसायिक उड्डाणं सुरू व्हायला आणखी दोन दिवस लागतील, असं नागरी उड्डाण राज्यमंत्री महेश शर्मा यांनी सांगितलं आहे. चेन्नई आता हळूहळू पूर्वपदावर येतीये. आतापर्यंत 11 लाख लोकांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. एनडीआरएफ, लष्कर, कोस्ट गार्ड यांचं युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. एनडीआरएफची 50 पथकं तैनात आहे. एनडीआरएफचं हे आतापर्यंतचं सर्वांत मोठं बचावकार्य आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close