कोल्हापुरात कर्ज बुडवा आंदोलन

February 13, 2010 12:52 PM0 commentsViews: 2

13 फेब्रुवारीकोल्हापुरात शेतकरी संघटनेने आज कर्ज बुडवा आंदोलन केले. पतसंस्थांनी शेतकर्‍यांना 8 टक्के दराने कर्जपुरवठा करावा, असा आदेश राज्य सरकारने दिला आहे. पण या आदेशाच पालन केले जात नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना जास्त व्याज भरावे लागत आहे. याचा निषेध करण्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पुलाजवळ पंचगंगा नदीत सरकारचा जीआर आणि कर्जांची पासबुक बुडवून आंदोलन केले. शेतकर्‍यांनी 8 टक्क्यांहून अधिक व्याज भरु नये असे आवाहन यावेळी करण्यात आले.

close