चेन्नईमध्ये अडकलेले बुलडाण्याचे विद्यार्थी सुखरुप परतले

December 5, 2015 3:28 PM0 commentsViews:

buldhana student405 डिसेंबर : चेन्नईमध्ये हाहाकार उडवलेल्या पावसात बुलडाण्याचे अडकलेले विद्यार्थी अखेर सुखरुप परतले आहे. पालकांसह शाळा व्यवस्थापनाने परत आलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं.

पूर पूरपरिस्थितीची अगोदरच कल्पना असल्यामुळे सर्व विद्यार्थी सुखरूप तिरुवल्लुरमध्ये थांबले होते. आता ही सर्व मुलं सुखरूप आपल्या घरी परतली आहेत.

आपल्या मुलांना परतल्याचं पाहुनं पालकांचे अश्रू अनावर झाले. सर्वांकडून सर्वतोपरी सहकार्य वेळोवेळी मिळत होते. त्यामुळे शाळा प्रशासनाने मीडिया सह सर्वांचेच आभार मानले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close