उद्यापासून एसी डबलडेकर मुंबई ते गोवा सुरू होणार

December 5, 2015 3:40 PM0 commentsViews:

ac double decker05 डिसेंबर : गोव्यातील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने दिलासा दिलाय. उद्यापासून मुंबई आणि मडगाव दरम्यान एसी डबलडेकर ट्रेन सुरू होणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते उद्या या डबलडेकर ट्रेनचं उद्घाटन होणार आहे.

यापूर्वी गणेशोत्सव आणि दिवाळीसाठी मुंबई ते कोकण ही डबलडेकर सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र ही गाडी प्रिमियम तिकीटदराने चालवण्यात आल्याने वादात सापडली होती. अखेर अनेक महिन्यांनतर कोकणवासियांसाठी एसी डबलडेकर रेल्वे सज्ज झालीय. आणि आनंदाची बाब म्हणजे ती नियमित तिकीटदराने चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 11085 ही आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवारी पहाटे 5.30 वा. एलटीटी मुंबईमधून सुटेल. ही एसी डबलडेकर ट्रेन ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, थिवीम आणि करमाळी या स्टेशन्सवर ही एसी डबलडेकर ट्रेन थांबणार आहे.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close