गुवाहाटीमध्ये कमी तीव्रतेचे 2 स्फोट, 2 जण जखमी

December 5, 2015 5:52 PM0 commentsViews:

guwahati05 डिसेंबर : गुवाहटीमधील फॅन्सी बाजारात कमी तीव्रतेचे दोन स्फोट झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. या स्फोटात 2 जण जखमी झाले आहे. जखमींना शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

फॅन्सी बाजार हे एक बिझनेस सेंटर असून इथं अनेक उद्योग संस्थेची कार्यालयं आहे. या बाजाराच्या मध्यभागी एकापाठोपाठ दो स्फोट झाले. हा स्फोट एका कचराकुंडीत झाला. या स्फोटामुळे लोकांनी बाजारातून बाहेर निघण्यासाठी धावाधाव केली यात दोघ जण जखमी झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. हा स्फोट का आणि कुणी केला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close