खाती सोडू वाटेना मंत्र्यांना, मंत्रिमंडळ विस्ताराची 10 कारणं !

December 5, 2015 6:13 PM0 commentsViews:

bjp_vistar05 डिसेंबर : अखेर मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याचं स्पष्ट झालंय, मात्र या दरम्यान पडद्यामागे अनेक हालचाली घडत होत्या. नेमकं काय घडत होतं, याची बित्तंबातमी आमच्या हाती लागली आहे. एकूण 10 कारणं आहेत. ज्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनपर्यंत होऊ शकला नाहीये.

अनेक ज्येष्ठ नेते मंत्रिपद मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकत होतेय. महसूल मंत्री एकनाथ खडसेंसह काही मंत्री आपल्याकडील काही ‘विशिष्ट’ खाती सोडायला तयार नाहीत.

एवढंच नाहीतर जादा मंत्रिपदे किंवा काही चांगली खाती मिळवण्यासाठी शिवसेनेचा दबाव आणत आहे. तसंच मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि चंद्रकांत पाटील यांच्यात विसंवाद दिसून आला. त्यामुळे भाजपने विस्तार लांबणीवर टाकलाय.

मंत्रिमंडळ विस्तार न होण्याचे 10 प्रमुख कारणे

1) भाजप हायकमांडकडून भाजप मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब नाही

2) मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्यांना विश्वासात घेतलं नाही

3) मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी अनेक ज्येष्ठांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव

4) घटक पक्षांतील दोघांना विधान परिषदेत घ्यावं लागेल, त्याची व्यूहरचना ठरलीच नाही

5) महादेव जानकरांना हवंय कॅबिनेट मंत्रिपद

6) खडसेंसह काही मंत्री आपल्याकडील काही ‘विशिष्ट’ खाती सोडायला तयार नाहीत

7) जादा मंत्रिपदे किंवा काही चांगली खाती मिळवण्यासाठी शिवसेनेचा दबाव

8) मंत्रिपदावरुन शिवसेनेत अंतर्गत धुसफूस, सेनेकडून अजूनही नावे दिली गेली नाहीत

9) आठवलेंनी राज्यात परतण्याचा भाजपचा आग्रह झुगारुन लावला

10) मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि चंद्रकांत पाटील यांच्यात विसंवाद

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close