व्हॅलेंटाईन डेसाठी 24 कोटींची फुले

February 13, 2010 2:30 PM0 commentsViews: 115

13 फेब्रुवारीव्हॅलेंटाईन डेसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. पण व्हॅलेंटाईन गिफ्टमध्ये महत्त्वाचं स्थान आहे ते फुलांना. व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी प्रेमीजनांना फुले मिळावीत म्हणून पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील शेतकरी प्रयत्न करत आहेत. मावळातील टप्पोरी गुलाबाची फुले जगप्रसिद्ध झालीत. येथील फुले देश-परदेशात निर्यात होतात. येथील फुल उत्पादक शेतकर्‍यांवर 'फियान'चे संकट आले होते. पण तरीही त्यांनी फुलांची लागवड केली. या हंगामात तर त्यांनी चक्क 24 कोटी रुपयांची फुले हॉलंड, लंडन, फ्रान्स, जर्मनी आदी देशांमध्ये निर्यात केली आहेत.शेतकर्‍यांच्या प्रयत्नामुळे हा व्हॅलेंटाईन प्रेमीजनांना नक्कीच आनंदात जाणार हे निश्चित.

close