महामानवाला त्रिवार वंदन, चैत्यभूमीवर लोटला जनसागर !

December 6, 2015 12:54 PM0 commentsViews:

chaityaboomi406 डिसेंबर : आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 59 व्या महापरिनिर्वाण दिन…आपल्या या महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर उसळलाय.

पांढरे शुभ्रवस्त्र परिधान केलेले अनुयायी, हातात निळे झेंडे आणि बाबांचा जयघोषाने अवघी चैत्यभूमी दुमदुमून गेलीये. आज पहाटेपासून अनुयायी चैत्यभूमीवर यायला सुरुवात झालीय. लाखोंच्या संख्येने येणार्‍या या अनुयायांसाठी शासनतर्फे सर्वतोपरी सोई सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे कुठेही कोणतीही गडबड नाही, गोंधळ नाही. शिवाजी पार्कवर पुस्तकं, सीडींची दुकानं उभारण्यात आलीये. अनुयायांसाठी काही सामाजिक आणि उद्योजक संस्थांकडून मोफत खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आलीये. आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं. त्यांच्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनीही बाबासाहेबांना अभिवादन केलं.

दरम्यान,भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी इंदू मिलमध्ये स्मारकाच्या जागेत पुतळे आणि गार्डन उभाराला विरोध केलाय. यापेक्षा या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाच इंस्टिट्युट उभारा असं ते म्हणाले आहे. देवेंद्र फडणविसांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचं इंस्टिट्यूट उभं केलं तर लोक त्यांना कायम लक्षात ठेवतील असंही ते म्हणाले.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close