छगन भुजबळ राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चेला उधाण

December 6, 2015 1:15 PM0 commentsViews:

bhujbal meet raj06 डिसेंबर : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर भेट घेतली. त्यामुळं राजकीय चर्चेला उधाण आलंय.

विविध प्रकरणांमध्ये भुजबळांची सध्या चौकशी सुरू असून ते पक्षात एकाकी पडल्याचं चित्र आहे. त्यामुळे या भेटीला महत्व प्राप्त झालंय. तर ही भेट कौटंुबिक होती असं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलंय. राज ठाकरे यांच्या आई आणि भुजबळांच्या पत्नी या मैत्रिणी आहेत. त्यांना भेटायचं होतं. त्यामुळे आम्ही सपत्निक राज यांच्या घरी भेटीसाठी गेलो. ही कौटुंबिक भेट होती राजकीय नव्हती असं स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिलंय.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close