पुण्यात बॉम्बस्फोट; 9 ठार 45 जखमी

February 13, 2010 3:22 PM0 commentsViews: 10

13 फेब्रुवारीपुण्यातील कोरेगाव पार्क भागातील प्रसिद्ध जर्मन बेकरीबाहेर जबरदस्त बॉम्बस्फोट झाला आहे. यात9 जण दगावले आहेत. तर45 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 5 महिला आणि4 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. जखमींना बुधराणी, जहांगीर या खासगी हॉस्पिटल्ससोबतच ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ससूनमध्ये 6 तर बुधराणीमध्ये 4 मृतदेह असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये AB+ आणि B+ रक्ताची गरज आहे. त्यासाठी नागरिकांना रक्तदानाचे आवाहन करण्यात येत आहे. हेल्पलाईन नंबर – 1066 स्फोटामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. सुरुवातीला हा स्फोट स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा असावा, असा अंदाज व्यक्त होत होता. पण बेकरीतली गॅस सिलेंडर सुरक्षित सापडली आहेत.पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली आहे. घटनास्थळी मुंबई आणि पुण्याचे एटीएसे पथक पोहोचले आहे. स्फोटाची तीव्रता लक्षात घेता, यामागे घातपाताचा संशय केंद्रीय गृहमंत्रालयाने व्यक्त केला आहे.दिल्लीहून सीबीआयचे पथक पुण्याकडे रवाना झाले आहे. तर मुंबईतही नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. संपूर्ण राज्यात हायअलर्टचा आदेश देण्यात आला आहे.घटनास्थळी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि जलसंपदामंत्री अजित पवार पोहोचले. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून 1 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.पुण्यातील कोरेगाव पार्क हा उच्चभ्रू एरिया आहे. या ठिकाणी बहुतेक फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत. तसेच परदेशी पर्यटकांची वर्दळ असलेले ओशो आश्रम आणि ज्यू धर्मियांचे छाबड हाऊस प्रार्थनास्थळ आहे. लष्कराचे दक्षिण विभागाचे मुख्यालयही या ठिकाणापासून जवळ आहे.

close