उद्धव ठाकरे आज दिल्लीत,पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता

December 6, 2015 2:28 PM0 commentsViews:

Uddhav tahcak06 डिसेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दिल्लीत आहेत. दिल्लीत शिवसेनेच्या सर्व खासदाराची बैठक घेणार आहे. संसदेतली पक्षाची भूमिका आणि राजकीय स्थितीवर ते सेना खासदारांशी चर्चा करणार आहे.

दिल्लीत उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री अरूण जेटलींच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी उद्धव दिल्लीत दाखल झाले आहे.

विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेना आणि भाजपचे संबंध चांगलेच ताणले गेले होते. उद्धव यांनी थेट पंतप्रधानांवर टीका केली होता. या वादानंतरही सेना-भाजप युती झालीच. आज उद्धव पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी भेट देता की नाही हे पाहण्याचं ठरेल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close