तपास सुरू, देशात हाय अलर्ट

February 14, 2010 9:27 AM0 commentsViews: 1

14 फेब्रुवारीपुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. हा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. एनआयए म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेटीव्ह एजन्सी एटीएसला तपासात मदत करणार आहे. घटनास्थळावरून पुरावे जमवण्याचे काम सुरू आहे. तपास पूर्ण झाल्याशिवाय कोणताच निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी पुण्यात म्हटले आहे. हा हल्ला म्हणजे गुप्तचर संस्थांचे अपयश नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच गेल्या दोन दिवसांतील पोलिसांच्या तैनातीचा परिणाम पुण्यातील सुरक्षेवर झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.9 ठार 57 जखमीदरम्यान बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या 57 जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी 20 जणांना उपचारानंतर डिस्चार्जही देण्यात आला आहे. स्फोटात मृत्यू पावलेल्यांची संख्या 9 झाली आहे. यापैकी 6 जण भारतीय आहेत. चिदंबरम यांनी पुण्यात बॉम्बस्फोटाच्या ठिकाणाला भेट दिली. आणि हल्ल्यातल्या जखमींची विचारपूस केली. देशात हाय अलर्टपुण्यातील बॉम्बस्फोटानंतर देशभरात हाय अलर्ट देण्यात आला आहे. रेल्वे स्टेशन्स, एअरपोर्टस, आण्विक केंद्रे आणि धार्मिक स्थळांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. विशेषतः मुंबई आणि दिल्लीत पेट्रोलिंग वाढवण्यात आले आहे. मुंबईतील सर्व हॉटेल्स आणि भाभा अणु संशोधन केंद्रात पोलिसांचा पहारा कडक करण्यात आला आहे. लष्कर ए तोयबाचा अतिरेकी डेव्हिड हेडलीने भेट दिलेल्या देशातील शहरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कोलकात्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेत टेस्ट मॅच सुरू आहे. त्या ठिकाणीही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गृहमंत्रालयाची बैठकपुणे स्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाची आपत्कालीन बैठक झाली. स्फोटासंदर्भातील माहिती गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधानांना सादर केली. पुण्यातील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, कानपूर, इंदूरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

close