पाकिस्तानशी चर्चा नको

February 14, 2010 9:47 AM0 commentsViews: 1

14 फेब्रुवारीभारतातील दहशतवादी कारवायांना पाकिस्तान जोपर्यंत आळा घालत नाही, तोपर्यंत सरकारने पाकिस्तानशी चर्चा करू नये, अशी मागणी भाजपने केली आहे. केंद्र सरकारचीही अगोदर हीच भूमिका होती. पण नंतर केंद्राने ती कुणाशीही चर्चा न करता बदलली. 26/11 नंतर परिस्थितीत कोणताच फरक पडला नाही. त्यामुळे केंद्राने पाकिस्तानशी चर्चा करू नये अशी मागणी भाजप नेते अरूण जेटली यांनी केली. विरोधी पक्षांची टीकाराज्यातील विरोधी पक्षांनी या बॉम्बस्फोटाच्या निमित्ताने पुन्हा सरकारवर टीका केली आहे. हा स्फोट म्हणजे सरकारला चपराक असल्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. तर माय नेम इज खान सिनेमाच्या सुरक्षेसाठी पोलिसांना गुंतवल्यानेच बॉम्बस्फोट झाला, असे शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. कोल्हापुरात निदर्शनेपुणे बॉम्बस्फोटाच्या विरोधात कोल्हापुरात भाजपने निदर्शने केली. या बॉम्बस्फोटाला काँग्रेस सरकारच जबाबदार आहे. असा आरोप यावेळी शिवाजी चौकात निदर्शने करणार्‍या भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. राज्य आणि केंद्र सरकारमध्ये ताळमेळ नसल्यानेच अशा घटना घडत असल्याचे या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. फेरविचार होणारदरम्यान पुणे स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानशी चर्चेबद्दल फेरविचार होऊ शकतो, असे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी स्पष्ट केले आहे.

close