विधान परिषदेसाठी अखेर सेना-भाजपची युती

December 6, 2015 5:58 PM0 commentsViews:

sena bjp vidhanparishad06 डिसेंबर : विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर शिवसेना आणि भाजप एकत्र आले आहे. विधानपरिषदेसाठी युतीवर शिक्कामोर्तब झालंय. विधानपरिषदेच्या 5 जागा भाजप लढवणार आहे. तर 3 जागांवर शिवसेना लढणार आहे. शिवसेना अकोला-वाशिम-बुलढाणा, मुंबई आणि अहमदनगरच्या जागा लढवणार आहे. तर भाजप मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, धुळे-नंदूरबार,आणि नागपूरच्या जागा लढवणार आहे.

मुंबईतल्या दोन जागांसाठी सेनेकडून विद्यमान आमदार रामदास कदम यांचं नाव जवळपास निश्चित आहे. तर भाजपकडून नगरसेवक मनोज कोटक आणि शायना एनसी यांनी फिल्डिंग लावलीय. काँग्रेसनं सध्या विद्यमान असलेल्या भाई जगताप यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याच निश्चित झाल्याचं समजतंय.

या दोन्ही जागांसाठी मुंबईतले 227 नगरसेवक मतदान करणार आहेत. त्यात सेनेची स्वतःची 75 मतं आहेत. जी सेनेच्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची मत देतील. त्यामुळे सेनेला आमदारकी मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत. पण भाजप आणि काँग्रेला मात्र त्यासाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार होती. आता शिवसेनेसोबत युती झाल्यामुळे भाजपचा बराचसा भार हलका झालाय.

शिवसेना या 3 जागा लढवणार
मुंबई
अहमदनगर
अकोला-वाशिम-बुलढाणा

भाजप या 5 जागा लढवणार
मुंबई
कोल्हापूर
सोलापूर
धुळे-नंदूरबार
नागपूर

आखाडा विधान परिषदेचा
मुंबईत जागा 2
- दोन्ही जागांसाठी मुंबईतले 227 नगरसेवक मतदान करणार
- सेनेची स्वतःची 77 मतं, जी सेनेच्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची मतं
- भाजपची 31 मतं आहेत, 25 मतांची गरज
- भाजपला मनसेची गरज, मनसेची 27 मतं
- काँग्रेसची 52 मतं आहेत, उर्वरित मतांसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू आहे

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close