पहिल्याच दिवशी सेना-भाजप आमने सामने

December 7, 2015 2:57 PM0 commentsViews:

sena_pm_office०७ डिसेंबर : नागपुरात वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी सेना- भाजप आमनेसामने आलेत.शिवसेनेनं श्रीहरी अणेंच्या राजीनाम्याची मागणी करत संयुक्त महाराष्ट्राचा नारा दिला तर भाजपने जय विदर्भाचा नारा देत सेनेला काऊंटर केलं. अशापद्धतीने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सेना भाजप आमनेसामने आलंय.

तर दुसरीकडे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या विदर्भाबद्दलच्या वक्तव्यावरून त्यांच्या विरोधात शिवसेना आमदारांनी आंदोलन केलं. आंदोलन करत अणेंविरोधात कारवाईची मागणी करण्यात आलीय. संयुक्त महाराष्ट्राचे लचके तोडणार्‍यांवर कारवाई करा अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी केली. तसंच श्रीहरी अणे यांच्या स्वतंत्र विदर्भ मागणीच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेनं मुंबईतही आंदोलन केलं. मुंबईतल्या हुतात्मा चौकात शिवसेनेनं निदर्शनं केलीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close