कांदिवलीतील आग आटोक्यात, 2 दोघांचा मृत्यू

December 7, 2015 6:04 PM0 commentsViews:

kandivali_fire07 डिसेंबर : मुंबईतील कांदिवली पूर्वच्या दामूनगरमध्ये पसरलेलं अग्नीतांडव अखेर शमलंय. या अग्नीतांडवात दोघांचा मृत्यू झालाय. फायर ब्रिगेडच्या 15 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय.

सिलेंडरच्या स्फोटांचे आवाज आल्याचं इथल्या प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं आहे. हा परिसर खूप दाटीवाटीचा आहे. त्यामुळे आग लागल्यावर पसरत गेली. या आगीत हजारो झोपड्या जळून खाक झाल्यात.

इथं पोहोचेपर्यंत फायरब्रिगेडला बराच वेळ लागला. या झोपड्या वनविभागाच्या जमिनीवर असल्याची माहिती आहे. दुपारची वेळ असल्यानं लहान मुलं शाळेत गेली होती,तर नोकरदार वर्ग कामाला गेल्यानं मोठी हानी टळली आहे. आता आग नियंत्रणात आहे. पण हजारो संसार मात्र उद्‌ध्वस्त झाले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close