जर्मन बेकरी नो मोअर…

February 14, 2010 10:31 AM0 commentsViews: 5

14 फेब्रुवारीओ माय गॉड…व्हेरी सॅड…जर्मन बेकरी इज नो मोअर…अशी बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या एका परदेशी तरुणाची पहिली प्रतिक्रिया होती. जर्मन बेकरी म्हणजे पुण्यातील कोरेगाव पार्क या उच्चभ्रू एरियातील एक हॉटेल. खरे तर इथे येणार्‍या परदेशी खवय्यांचा 'ढाबा', असे वर्णन या बेकरीचे करता येईल. कॉन्टिनेन्टल पदार्थ ऑरेंज ज्यूस, ऍपल पाय, बेकड् पोटॅटो, बर्गर एग टोस्ट, सॅलडस् हे कॉन्टिनेन्टल पदार्थ इथे वाजवी दरात मिळतात.गेली 20 वर्षांपासून हे रेस्टॉरंट इथे येणार्‍या परदेशी पाहुण्यांचा पाहुणचार करत आहे. या बेकरीकडून परदेशी पाहुण्यांच्या काही 'गरजा' भागवल्या जातात, अशीही चर्चा आहे. अमली पदार्थ विक्रीच्या संशयावरून पोलिसांनी अनेकदा या बेकरीवर छापे घातले आहेत. ही बेकरी शंकर खरोसे आणि राम खरोसे यांच्या मालकीची आहे. पण सध्या गोपाल मनिपुरी ही बेकरी चालवत आहेत.साधकांचीवर्दळओशो आश्रमाच्या जवळच ही बेकरी आहे. त्यामुळे आश्रमातील साधकांची इथे वर्दळ असते. जवळच ज्यू धर्मियांचे छाबडा हाऊस हे प्रार्थनास्थळ आहे. 26/11च्या हल्ल्यातील संशयित हेडलीही या परिसरात येऊन गेला होता. त्यामुळेच या जर्मन बेकरीला अतिरेक्यांनी टार्गेट केले असावे, असे बोलले जात आहे.बेवारस बॅग काल संध्याकाळी बेकरीतील एक वेटर टेबलखाली ठेवलेली बॅग काढायला गेला आणि जबरदस्त स्फोट झाला…स्फोटामुळे बेकरीच्या समोरच्या भिंतीला 6 बाय 4 फुटाचे भगदाड पडले. आणि स्फोटात 9 जणांनी जीव गमावला तर 57 लोक जखमी झाले.

close