अकोला किडनी रॅकेट प्रकरणी मुख्य सुत्रधार गजाआड

December 7, 2015 8:02 PM0 commentsViews:

akola kidni07 डिसेंबर : अकोला किडनी रॅकेट प्रकरणी चौथा आरोपी आणि मास्टरमाइंड शिवाजी कोळीला अटक करण्यात आली. किडनी रॅकेटची सगळी कळसूत्री शिवाजीकडे होती. शिवाजीला अकोल्यातूनच अटक केली असल्याची माहिती अकोला पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. किडनीच्या दोन प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात
आलीये. किडनी रॅकेट प्रकरणातला मुख्यसुत्रधार शिवाजी कोळीच्या अटकेनंतर या प्रकरणाची पाळमुळं कुठपर्यंत रोवली गेली आहेत याचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close