मेगाब्लॉकमुळे हाल

February 14, 2010 11:15 AM0 commentsViews: 6

14 फेब्रुवारीरेल्वेच्या मेगाब्लाकमुळे आज मुंबई आणि पुणेकरांचे हाल झाले. पुणे- मुंबई दरम्यान देहूरोड, कर्जत, विक्रोळी इथे जुने उड्डाणपूल पाडण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे आज ठाणे ते विक्रोळी दरम्यान पॉवर ब्लॉक आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. पश्चिम रेल्वेवर काल रात्री पाऊण ते 4.40 पर्यंत मेगाब्लॉक होता. सेंट्रल रेल्वेवर भिवपुरी-पळसदरी, विक्रोळी, कर्जत, मस्जिद या मार्गांवर सकाळी 9पासून मेगाब्लॉक सुरु आहे. हा मेगाब्लॉक संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे. यामुळे लोकल्स 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. उड्डाणपुलांच्या कामामुळे पुणे-मुंबई दरम्यानच्या एक्सप्रेस गाड्यांसह पुणे-लोणावळा दरम्यानच्या लोकल्स आज बंद आहेत. सकाळी सहाची पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस वेळेप्रमाणे धावली. पण डेक्कन, इंटरसिटी, प्रगती , पुणे-मनमाड, पुणे-कर्जत, मुंबई-कोल्हापूर दरम्यान धावणारी कोयना एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या. तर मुंबई-बंगळुरू उद्यान एक्सप्रेस, नागरकोईल एक्सप्रेस, आणि मुंबई-हैदराबाद एक्सप्रेस या गाड्यांचा मार्ग बदलून इगतपुरी-मनमाड मार्गे सोडण्यात आल्या. मुंबईहून पुण्याला येणारी सिंहगड एक्सप्रेस दुपारी अडीचच्या ऐवजी संध्या 5.30 वाजता सुटणार आहे.

close