शाळेमध्ये शौच केल्यामुळे चिमुकलीचं शिक्षण बंद

December 7, 2015 9:54 PM0 commentsViews:

school panishment07 डिसेंबर : शाळेमध्ये शौच केल्यामुळे एका 5 वर्षांच्या चिमुकलीचं शिक्षण बंद केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आलाय.

खरं तर शौच होणे हा नैसर्गिक प्रकार आहे आणि त्यातही लहान मुलांनी शौच करणं स्वाभाविक आहे पण या प्रकाराला अत्यंत गंभीरतेने घेत, पिंपरी शहरातील सांगवी परिसरात असलेल्या या रेनबो शाळा प्रशासनाने याच शाळेत शिकणार्‍या आपल्या विद्यार्थिनीबरोबर हे कृत्य केल्याचा आरोप पालकाने केला आहे.

याहूनही धक्कादायक बाब म्हणजे घडल्या प्रकारचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या या पीड़ित मुलीच्या वडलांना शाळा प्रशासनाने मुलीकडून असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून लेखी हमी पत्र मागितलं. हा सपूर्ण प्रकार माध्यमाना आणि पोलिसांना कळल्यानंतर शाळा प्रशासनाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आणि असा प्रकार घडलाच नसल्याचं सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close