परप्रांतीयांची झाडाझडती व्हावी

February 14, 2010 11:45 AM0 commentsViews: 1

14 फेब्रुवारीजोपर्यंत महाराष्ट्रात येणार्‍या परप्रांतीयांची झाडाझडती होत नाही, तोपर्यंत सुरक्षेचा मूळ प्रश्न सुटणार नाही. आणि बॉम्बस्फोट थांबणार नाहीत, असे परखड मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलेआहे. राज ठाकरे यांनी आजपासून सिंधुदुर्गातून कोकण दौरा सुरू केला. त्यावेळी कुडाळमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. पुण्याच्या बॉम्बस्फोटाचे राजकारण करून भाजप आणि शिवसेना मूर्खपणा करत आहेत. हीच भाजप-सेना सत्तेत असताना संसदेवर हल्ला झाला होता. आणि पाकिस्तानकडे जाण्यासाठी समझौता एक्सप्रेस यांनीच सुरू केली होती, अशी आठवणही त्यांनी करून दिली. सिंधुदुर्ग दौरा आटोपून राज उद्या रत्नागिरीकडे रवाना होणार आहेत.

close