शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, काँग्रेसचा विधानभवनावर मोर्चा

December 8, 2015 2:25 PM0 commentsViews:

congress march408 डिसेंबर : नागपूर अधिवेशनात आज काँग्रेसने सरकारला सभागृह आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी कोंडीत पकडण्याची रणनिती आखलीये.म्हणूनच आज अधिवेशन सुरू होताच काँग्रेसने कृषी कर्जमाफीसाठी निदर्शनं केली. सभागृहात आज सरकारने इतर सर्व कामकाज रद्द करून शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा करावी, अशी मागणी काँग्रेस -राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली. दरम्यान, दीक्षाभूमीपासून काँग्रेसने धडक मोर्चाचं आयोजन केलंय. आता हा मोर्चा विधानभवनाकडे निघाला आहे.

शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, शेतीमालाला योग्य हमी भाव द्या, शेतकर्‍यांना प्रतिहेक्टर 25 हजार रुपये मदत द्या आणि आत्महत्या थांबण्यासाठी ठोस उपाययोजना करा अशा मागण्या काँग्रेसने केल्या आहेत.

दुसर्‍या दिवशीही कामकाज तहकूब

सलग दुसर्‍या दिवशी विधानसभा कामकाजाविनाच तहकूब करण्यात आली. तर विधान परिषद अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आली. काँग्रेस राष्ट्रवादीने शेतकर्‍यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावर गदारोळ करत सभागृहाचं कामकाज बंद पाडलं. तर एकनाथ खडसेंनी सरकार विरोधक फक्त राजकारण करत असल्याचा आरो़प केलाय.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close