मी इंदिरा गांधींची सून, कुणाला घाबरत नाही -सोनिया गांधी

December 8, 2015 2:38 PM0 commentsViews:

sonia gandhi_national08 डिसेंबर : मी कुणाला घाबरत नाही आणि घाबरलेही नाही. मी इंदिरा गांधींची सून आहे असा शब्दात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपला सुनावलंय. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी यांची आज कोर्टात हजेरी टळलीये. त्यानंतर त्यांनी ही जळजळीत प्रतिक्रिया दिली.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधींना तात्पुरता दिलासा मिळालाय. सोनिया आणि राहुल गांधी यांची कोर्टातली आजची हजेरी टळलीय. आता पुढची सुनावणी 19 डिसेंबरला होणार आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी कोर्टाने हजर राहण्याचे आदेश दिले होते.

नॅशनल हेराल्डची 5 हजार कोटींची मालमत्ता सोनिया, राहुलनी लाटल्याचा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केलाय. सोनिया, राहुल यांच्यासोबतच काँग्रेसच्या चार नेत्यांवर सुब्रमण्यम स्वामींनी दावा दाखल केलाय.

लोकसभेतही नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला. काँग्रेस सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आणि सरकार सुडबुद्धीनं वागत असल्याचा आरोप केला.  या प्रकरणावर सोनिया गांधींनी कोर्टाने निर्णय द्यावा, मी कुणाला घाबरत नाही आणि घाबरलेही नाही. मी इंदिरा गांधींची सून आहे अशी प्रतिक्रिया सोनियांनी दिली.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close