पुन्हा लोकल बफरला धडकली

December 8, 2015 3:08 PM0 commentsViews:

cst train accident08 डिसेंबर : चर्चगेट स्टेशनवर लोकल अपघाताची पुन्हा पुनरावृत्ती झालीये. छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरील बफरला धडकून लोकलचे दोन डबे घसरले. काल मध्यरात्री दोनच्या सुमारास लोकल शटिंगच्यावेळीस हा अपघात घडला.

अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. रात्रीची वेळ असल्यानं इथं गर्दी नव्हती त्यामुळे मोठी हानी टळली. पण लोकल आणि प्लॅटफॉर्मचं मोठं नुकसान झालं. दरम्यान, सकाळी ही लोकल हटवण्यात आली. त्यामुळं सीएसटीहून सुटणार्‍या काही लोकल उशिराने धावतायत. याआधीही दोन महिन्यांपूर्वी चर्चगेट स्टेशनवर लोकल बफरला धडकून असाच त्या अपघात झाला होता.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close