शहरांच्या सुरक्षेचा आढावा

February 14, 2010 1:35 PM0 commentsViews:

14 फेब्रुवारीपुणे बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज राज्यातील सुरक्षेचा आढावा घेतला. यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत गृह सचिव चंद्रा अय्यंगार, मुंबईचे पोलीस आयुक्त डी. शिवानंदन, मुंबई क्राईम ब्रँचचे जॉईंट सीपी राकेश मारिया, हिमांशु रॉय उपस्थित होते.22 लाखांची मदतबॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांना 22 लाखांची तातडीची मदतही मुख्यमंत्री निधीतून देण्यात आली. स्फोटाच्या तपासासाठी नाकाबंदी करण्यात येत आहे. त्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

close