कांदिवली अग्नितांडवात तब्बल 20 सिलेंडर्सचा स्फोट !

December 8, 2015 1:25 PM0 commentsViews:

kandivali fire (11)08 डिसेंबर : कांदिवली पूर्वच्या दामूनगरमध्ये काल दुपारी भीषण आग लागली होती. या आगीत 2 हजारांपेक्षा जास्त झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत होरपळून 2 जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये एका लहानग्याचा समावेश आहे. आगीमध्ये 11 जण जखमी झाले. या आगीमुळे दोन हजार झोपड्यांमधले लोक रस्त्यावर आलेत. कालची रात्र त्यांनी उघड्यावरच काढली. 20 सिलेंडर्सचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली.

इथल्या रहिवाशांना या भयानक स्फोटाचे आवाज आले आणि त्यानंतर ही आग पसरत गेली. कांदिवलीतला हा दामूनगरचा परिसर खूप दाटीवाटीचा आहे. सुमारे 15 एकर जमिनीवर या सगळ्या झोपड्या होत्या. महत्त्वाचं म्हणजे ही जमीन वन विभागाची आहे आणि या वनविभागाच्या जमिनीवर झोपड्यांचं हे अतिक्रमण होतं. पण ही आग लागली की लावली याबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहे.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close