नेत्यांची घटनास्थळाला भेट

February 14, 2010 1:42 PM0 commentsViews: 2

14 फेब्रुवारीपुण्यात कोरेगाव पार्कमध्ये ज्या जर्मन बेकरीसमोर स्फोट झाला त्या घटनास्थळाला आज अनेक नेत्यांनी भेट दिली. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, कृषीमंत्री शरद पवार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, सुषमा स्वराज, प्रकाश जावडेकर आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचा यात समावेश होता.तर बॉम्बस्फोट झाल्यावर लगेच घटनास्थळावर पोहचणारे मंत्री होते गृहराज्यमंत्री रमेश बागवे. जलसंपदामंत्री अजित पवार आणि सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही काल लगेच धाव घेऊन घटनास्थळाला भेट दिली. तसेच जखमींची विचारपूस केली.

close