…जेव्हा नितीन गडकरी वाहतूक कोंडीत 2 तास अडकतात !

December 8, 2015 5:10 PM0 commentsViews:

niitn gadkari_trafik08 डिसेंबर : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरीच काल सोमवारी दिल्लीच्या ट्रॅफिकमध्ये तब्बल 2 तास अडकून पडले होते. दिल्ली एअरपोर्टकडे जात असताना गडकरींना महिपालपूर पुलावर दोन तास दिल्लीच्या वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागलं.

यावरून गडकरींनी अर्थातच एनएचएआयच्या अधिकार्‍यांना फटकारलं देखील पण या निमित्ताने दिल्लीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा चर्चेला आलाय. म्हणूनच गडकरींनी संबंधित अधिकार्‍यांना यावर तत्काळ तोडगा काढण्याचे आदेश दिले आहे.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close