जगात भारी, एका सामाजिक लग्नसोहळ्याची गोष्ट !

December 8, 2015 6:50 PM0 commentsViews:

kolhapur_marridge08 डिसेंबर : जगात भारी…अशी ओळख असलेल्या कोल्हापूरमध्ये शिवाजी पेठ म्हणजे तर कोल्हापूरची रांगडी परंपरा जपणारी पेठ…याच पेठेत एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला. शहरात रिक्षा चालवणारे राजेंद्र जाधव यांच्या मुलाचा हा विवाह सोहळा होता.

शहरातल्या निवृत्ती चौकात पार पडलेल्या या लग्नाला राजकीय सामाजिक, क्षेत्रातल्या मान्यवरांनीही हजेरी लावली होती. अनेक वेळा लग्नामध्ये अक्षतांसाठी तांदूळ वापरले जातात. पण या लग्नात फुलांचा वर्षाव वधु वरांवर करण्यात आला. तसंच वाजंत्री म्हणून कोल्हापूरमधल्या अंध आणि अपंग कलाकारांच्या पथकाला बोलावण्यात आलं होतं. त्यांनी वाजवलेल्या वाद्यांनी लग्नाच्या समारंभात
वाजंत्र्यांची भूमिका पार पाडली.

विशेष म्हणजे या लग्नात अहेर स्विकारण्यात आला पण तोच अहेर समाजातल्या गरजू लोकांना देण्याचा संकल्पही या लग्नात करण्यात आला. अहेरांसाठी खास देणगी पेट्याही या लग्नावेळी ठेवण्यात आल्या होत्या.

शिवाजी पेठेतल्या नागरिकांनीही या विवाहसोहळ्याचं कौैतुक करत लग्नासाठी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती. त्यामुळे आयुष्यातल्या नव्या वळणावर या वधुवरांनीही समाजामध्ये लग्नासाठी वायफळ खर्च न करता सामाजिक बांधिलकी जपली जाऊ शकते याचाच संदेश दिलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close