शनी शिंगणापूर प्रकरणी मुंबई धर्मदाय आयुक्ताकडे अहवाल सादर

December 8, 2015 6:58 PM0 commentsViews:

Shanishinganapur08 डिसेंबर : शनी शिंगणापूर प्रकरणी मुंबई धर्मदाय आयुक्तांकडे अहवाल सादर करण्यात आलाय. नगर सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी सोमवारी सीसीटीव्ही फुटेजसह अहवाल सादर केलाय.

नगर धर्मादाय आयुक्तालयानं नुकतीच घटनास्थळाची पाहणी केलीय. यावेळी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍यातली दृश्य आणि विश्वास्तंाशी चर्चा करुन अहवाल तयार केला. अहवालात सीसीटीव्हीनुसार घडलेला घटनाक्रम, गावबंद आणि दुग्धअभिषेकाचा उल्लेख करण्यात आलाय. फक्त वस्तुस्थिती नमूद करण्यात आली असून कोणताही अभिप्राय नाही. मुंबई धर्मादाय आयुक्तांकडून अहवाल मागवला असून सरकारला सादर करण्यात येणार आहे. या अधिवेशनात शनी शिंग्णापूरचा मुद्दा उपस्थित होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा अहवाल पाठवण्यात आलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close