द. आफ्रिकेची इनिंग कोसळली

February 14, 2010 1:49 PM0 commentsViews: 3

14 फेब्रुवारीकोलकाता टेस्टमध्ये चांगल्या सुरुवातीनंतर दक्षिण आफ्रिकेची इनिंग कोसळली. आणि पहिल्या दिवस अखेर आफ्रिकन टीमने नऊ विकेटवर 266 रन्स केले. टी ब्रेक पर्यंत आफ्रिकन टीम दोन विकेटवर 229 अशा मजबूत स्थितीत होती. पण त्यानंतर झहीर आणि हरभजन सिंगने त्यांना हादरवले. झहीरने अमला आणि पीटरसन या सेंच्युरियन बॅट्समनना आऊट केलं. आणि आफ्रिकन मिडल ऑर्डरला सुरुंग लागला. त्यानंतर हरभजनने धोकादायक कॅलिसला आऊट केलं. प्रिन्स आणि ड्युमिनीला तर त्याने लागोपाठच्या बॉलवर पॅव्हेलिअनमध्ये पाठवलं. तिसर्‍या सेशनमध्ये आफ्रिकन टीमने एकूण सात विकेट गमावल्या. अखेर अपुर्‍या प्रकाशामुळे खेळ अर्धा तास लवकर संपवण्यात आला. झहीर आणि हरभजनने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. त्यापूर्वी आफ्रिकन टीमतर्फे हशिम अमला आणि अल्विरो पीटरसन यांनी सेंच्युरी ठोकली. पीटरसनने तर पदार्पणातच सेंच्युरी करण्याची किमया केली.

close